बिजनेस में हमेशा “बेच बेच के सीखो” सफलता जरूर मिलेंगी : डॉ. प्रसाद तिगलपल्ली

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबतच नवीन कौशल्य आधारित शिक्षण मिळावे आणि तांत्रिक शिक्षणाचा विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्धीसाठी उपयोग व्हावा हा प्रमुख उद्देश समोर ठेवून ता. २३ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट दरम्यान “जर्नी ऑफ इनोवेशन स्टार्टअप अँड इंटरप्रनर्शिप” या पाच दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने ता. २६ शनिवार रोजी स्टार्टअप मार्गदर्शक व मुंबई येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्रा. डॉ. प्रसाद तिगलपल्ली व जळगाव येथील गांधी रिसर्च फाउंडेशनच्या रिसर्च डीन प्रा. गीता धर्मपाल यांना या कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल व जी. एच. रायसोनी महाविद्यालयाचे अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत हे उपस्थित होते. आपली आवड व क्षमता या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन करिअरची योग्य निवड कशी करावी ? करिअरच्या अवघड टप्प्यांवर कोणत्या गोष्टींचा विचार करावा ? या विषयांवर करिअर समुपदेशक व प्रसिद्ध व्यवस्थापन तज्ञ प्रा. डॉ. प्रसाद तिगलपल्ली व प्रा. गीता धर्मपाल हे उपस्थित विदयार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या मनातील प्रश्न नक्की सोडवतील असा आशावाद त्यांनी आपल्या प्रास्ताविकेत प्रा. डॉ. अग्रवाल व्यक्त करत महाविध्यालयाच्या विविध उपक्रमाची माहिती दिली. या नव्याने उदयास येणा-या क्षेत्रात करीयर करावयाचे असल्यास त्या क्षेत्राशी संबंधीत विषयात पारंगत असणे काळाची गरज आहे. तुमचे कौशल्य आणि अभ्यासक्रम यांची सांगड घालून तुम्ही शिक्षणक्रम पूर्ण केला.असे प्रतिपादन त्यांनी केले.

यानंतर कार्यशाळेच्या दुसऱ्या वक्त्या व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या रिसर्च डीन प्रा. गीता धर्मपाल यांनी देशभरातील तरुणाईसाठी ‘गांधी तीर्थ’ प्रेरणादायी स्थळ असून महात्मा गांधीजींच्या विचारांची, संस्कारांची आजही गरज आहे. महात्मा गांधीजींच्या विचारांचे महत्त्व आजही, भविष्यातही महत्त्वपूर्ण असून ते जगमान्य आणि कालातीत आहेत. संपूर्ण जगाला गांधीजींना सांगितलेल्या मार्गावर चालण्याशिवाय पर्याय नाही. महात्मा गांधीजींच्या विश्वस्त भावनेतून समाजाकडे बघून विध्यार्थ्यानी कार्य करावे’ असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. सदर कार्यशाळेत अभियांत्रिकी व व्यवस्थापन या विषयातील सर्व विभागातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. कार्यशाळेच्या आयोजनासाठी एमबीए विभागप्रमुख कौस्तव मुखर्जी, प्रा. विशाल राणा, प्रा. जितेंद्र जमादार, प्रा. परिशी केसवानी, प्रा. तन्मय भाले, प्रा. योगिता पाटील व आदींनी सहकार्य केले तर कार्यशाळेचे सूत्रसंचालन विवेक पाटील या विध्यार्थ्याने केले तसेच आभार प्रदर्शन प्रा. ज्योती जाखेटे यांनी मानले सदर कार्यशाळेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्युटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी यांनी कौतुक केले.

Leave A Reply

Your email address will not be published.