भिडेंवर संतापले सौमित्र; केली अटकेची मागणी…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य करून संभाजी भिडे चांगलेच अडचणीत आले आहेत. अनेक राजकीय पक्ष त्यांच्याविरुद्ध कारवीच्या मागणीसाठी ठिकठिकाणी आंदोलनं करत आहेत. त्यांनी महात्मा गांधींच्या वडिलांविषयी चुकीचे वक्तव्य केल्याने सर्वस्तरातून नाराजीचा एकच सूर येऊ लागलाय. मनोहर भिडेंच्या वक्तव्यामुळे शुक्रवारी (२८ जुलै) विधानसभेत विरोधी पक्षातील नेते आक्रमक झाले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली होती. तर भिडे हे भाजपाचं पिल्लू असल्याचं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं होतं.

दरम्यान, अश्यातच ज्येष्ठ अभिनेते व कवी किशोर कदम (सौमित्र) यांनीही फेसबूक पोस्ट करत भिडेंच्या अटकेची मागणी केली आहे. ती पोस्त सध्या खूप व्हायरल होत आहे.

त्यांनी आपल्या पोस्त मध्ये लिहिले कि,

‘अजित पवारांना उपमुख्यमंत्री करत भिडे वृत्तीच्या माणसांना बोलतं करून अजित पवारांना हतबल करत राहणं हा राजकारणाचा भाग आहे. आपण सगळेच या राजकारणामुळे कोंडीत सापडलो आहोत. आता हा मुद्दा शिंदेजी आणि अजितजी कसे हाताळतात हा नसून माननीय फडणवीसजी या दोघांची मजा बघत बसणार नाहीत अशी अपेक्षा आहे. तसं नसेल तर तात्काळ संभाजी नव्हे, मनोहर भिडे या भयानक विकृत वृत्तीच्या माणसाला अटक करावी अशी मी एक कलावंत म्हणून मागणी करीत आहे.’

 

Leave A Reply

Your email address will not be published.