बिडी घेऊन येतो असे सांगून वृद्ध काका झाले बेपत्ता

0

रावेर ;-तालुक्यातील शिंगाडी येथून एक 65 वर्षीय वृद्ध व्यक्ती पान टपरी वरून बिडी घेऊन येतो असे सांगून बेपत्ता झाल्याची तक्रार पुतण्याने दिल्यावर हरवल्याची नोंद निंभोरा पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की रावेर तालुक्यातील शिंगाडी येथील रहिवासी प्रकाश वासुदेव पाटील वय 65 हे मी पान टपरीवर बिडी घेऊन येतो असे सांगून 26 जुलै रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घराबाहेर निघून गेले. मात्र त्यांचा नातेवाईकांसह इतर ठिकाणी शोध घेतला असता ते मिळून न आल्याने नितीन सुरेश पाटील व 34 यांनी दिलेल्या खबरीवरून निंभोरा पोलीस स्टेशनला हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.