मंगळ ग्रह मंदिर परिसरातून वृद्ध व्यक्तीची सोन्याची चैन चोरली

0

अमळनेर ;-येथील मंगळ ग्रह मंदिर परिसरातून १८ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन अज्ञात चोरट्याने लांबवण्याची घटना 25 जुलै रोजी दुपारी दीड ते अडीच वाजेच्या सुमारास घडली.

याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे .याबाबत सूत्रांनी दिलेले माहिती अशी की नारायण वामन खडके वय 69 हे सेवानिवृत्त कर्मचारी असून ते पटवारी कॉलनी अमळनेर येथे राहतात. 25 जुलै रोजी ते मंगळ ग्रह मंदिरात दर्शनासाठी आले असताना दुपारी दीड वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने त्यांची अठरा हजार रुपये किमतीची सोन्याची चैन चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी नारायण खडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.