मुलबाळ होत नसल्याने व माहेरून १५ लाख रुपये आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा छळ

0

फैजपूर;-विवाहितेला मूलबाळ होत नसल्याच्या कारणावरून आणि माहेरऊन 15 लाख रुपये आणावेत या मागणीसाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध फैजपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की भाग्यश्री सुदर्शन गिरासे वय 32 यांचा विवाह वाठोडे तालुका शिरपूर येथील सुदर्शन अशोक सिंह गिरासे यांच्याशी झाला होता मात्र लग्नानंतर 2019 पासून ते डिसेंबर 2021 पर्यंत अधून मधून पती सुदर्शन अशोक सिंह गिरासे प्रमिला अशोक सिंह गिरासे दोन्ही राहणार वाटोळे तालुका शिरपूर जिल्हा धुळे मीनल संदीप राजपूत, पायल छत्रपाल राजपूत दोन्ही राहणार पुणे प्रकाश गोरख राजपूत राहणार वाठोडे यांनी कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पंधरा लाख रुपये आणावेत व विवाहितेने आणल्याने तसेच तिला मूलबाळ होत नसल्याच्या कारणावरून वरील सर्व आरोपींनी तिचा मानसिक व शारीरिक छळ करून तिला शिवीगाळ मारहाण करून तिच्या अंगावरील स्त्री धन काढून तिला माहेरी पाठवून दिले. भाग्यश्री गिरासे यांनी फैजपुर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल देविदास सूरदास करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.