मुंबईत दहशदवादी हल्ला होण्याची शक्यता, वाचा सविस्तर

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

मुंबईतील कुलाबा येथील चाबाड हाऊसचे फोटो दहशदवाद्यांकडून सापडल्याने खळबळ माजली आहे. महाराष्ट्र दहशतवाद (Terrorism) विरोधी पथकाला दहशदवाद्यांकडून कुलाबा येथील चाबड हाऊसचे गुगल फोटो सापडले आहे. यामुळे यंत्रणा सतर्क झाल्या असून चाबड हाऊसच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

संशयितांकडून चाबड हाऊसचे फोटो जप्त
एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, कुलाबा येथील चाबड हाऊसचे काही गुगल फोटो संशयित आरोपींकडून सापडले आहे. या पार्श्वभूमीवर चाबड हाऊसची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. चाबड हाऊसमध्ये आधीच अतिशय कडक सुरक्षा आहे. गुरुवारी मध्यभागी आणि बाहेरील भागात एक मॉक ड्रिल देखील घेण्यात आहे होते. अशी माहिती कुलाबा पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

राजस्थान मधून अटक
२६/११ च्या दहशदवादी हल्ल्याच्या लक्ष्यांपैकी एक असलेल्या चाबड हाऊसचे गुगल फोटो दहशदवाद्यांकडे सापडले आहेत. या दोन आरोपींना हल्ल्याचा कट रचल्याबद्दल राजस्थानमधून अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या घडामोडीनंतर पोलिसांनी कुलाबा येथील ज्यू कम्युनिटी सेंटरमध्ये सुरक्षा वाढविण्यात आली असून पोलिसांकडून मॉकड्रील सुद्धा घेण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.