मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली

0

नवी दिल्ली ;- मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी दिल्ली उच्च न्यायालयाने पुढे ढकलली आहे. आता मनीष सिसोदिया यांच्या याचिकेवर १३ मे रोजी सुनावणी होणार आहे.

मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी ईडी आणि सीबीआयने मनीष सिसोदिया यांच्या जामीन याचिकेवर उत्तर दाखल करण्यासाठी एका आठवड्याचा अवधी मागितला होता. मात्र, न्यायालयाने केवळ चार दिवसांची मुदत दिली आहे. दरम्यान, सुनावणीदरम्यान मनीष सिसोदिया यांचे वकील विवेक जैन यांनी अतिरिक्त वेळ देण्याच्या मागणीला विरोध केला.

वकील विवेक जैन म्हणाले की, मनीष सिसोदिया न्यायालयीन कोठडीत आहेत आणि ईडीने सर्वोच्च न्यायालयाला आश्वासन दिले होते की, हे प्रकरण सहा महिन्यांत पूर्ण केले जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.