सातपुड्यात सर्रास वृक्षतोड; जंगल तस्करांचे वनविभागाशी साटेलोटे

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

यावल आडगाव येथे वनक्षेञात येणाऱ्या सातपुड्यात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरु आहे. विशेष म्हणजे याकडे सर्वांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्यामुळे भविष्यात सातपुड्याचे अस्तित्वच धोक्यात येण्याची भीती निर्माण झालीय.

वन आधिकाऱ्यांचे जंगल तस्करांशी मिलीभगत असल्यामुळे सातपुड्याच्या कुशीत मनुदेवी या तीर्थक्षेत्र परिसरातील अनमोल अशा डेरेदार वृक्षाची कत्तल करत आहेत. विशेष म्हणजे हे सर्व नियोजन अंधरित्या सुरु आहे. एकीकडे शासन करोडो रुपये खर्च करुन वृक्ष लागवडीचे कार्यक्रम हाती घेत आहे. तर दुसरीकडे मात्र, सातपुड्यात वृक्षांची सर्रास कत्तल सुरु आहे. त्यामुळे सातपुड्यातील वनसंपत्ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे वन्यप्रेमी बांधव मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करीत आहेत

सातपुड्यातील डोंगर व परिसरातील जंगलतोड थांबवा- हिंदवी स्वराज्य सेना महाराष्ट्र राज्य

सातपुड्यातील जमिनीमधील पाण्याची पातळी दिवसेंदिवस दिवस खाली जात आहे. याला सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्या परिसरात होणारी ही बेहिशोब जंगलतोड.  ही जंगलतोड रोखण्यासाठी सरकारने पावले उचलावीत किंवा काय करावे याची वाट आपण पाहत बसतो. तर येणाऱ्या पिढीला पिण्याला पाणी सुद्धा उपलब्ध होणार नाही. याप्रमाणे सातपुडा जंगलतोडमुळे सिद्ध होते की, पुढील काळात उत्तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध असा निसर्ग रम्य सातपुडा पर्वत नष्ट होईल.

वन अधिकाऱ्यांच्या देखरेखी खाली सर्रास दररोज हजारो झाडे कापली जातात. भ्रष्ट अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी हिंदू स्वराज्य सेना संघटनातर्फे करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.