सतीश कौशिक यांची ‘अपूर्ण’ ईच्छा सलमान करणार पूर्ण, वाचा सविस्तर

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

सतीश कौशिक (Satish Kaushik) यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण बॉलीवूडला धक्का बसला होता. त्यांचे जवळचे मित्र तर अजूनही यातून पूर्णपणे सावरले नाही. सलमान खान (Salman Khan) आणि सतीश कौशिक यांचे चांगले संबंध होते, तसेच सलमान खानला सतीश यांनी आपल्या ‘तेरे नाम’ (Tere Naam) चित्रपटात काम करण्याची संधी दिल आणि सलमानने त्याच सोन केलं. 2003 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. हा चित्रपट सतीश कौशिक यांनी दिग्दर्शित केला होता. सतीश कौशिक आता आपल्यात नाही मात्र सलमान बोलला की त्याने ‘मतेरे नाम 2’ कल्पनेवर सतीश कौशिक यांच्यासोबत चर्चाही केली होती.

मीडिया रिपोर्ट नुसार सतीश यांच अपूर्ण राहिलेल काम सलमान पूर्ण करणार आहे. ‘तेरे नाम’ चा सिक्वल लवकरच प्रेक्षांच्या भेटीला येऊ शकतो. सलमान खानने सांगितले की, सतीश कौशिक यांनी 20 वर्षांपूर्वी ‘तेरे नाम’साठी फक्त एका ओळीची आईडिया दिली आणि त्यानंतर सलमानला वाटले की ही एक सुपर आयडिया आहे. सलमानने पुढे खुलासा केला की त्यांने ‘तेरे नाम’ च्या कथानकावर चर्चा केली होती आणि 20 वर्षांनंतर कथेत काय घडलं असतं याबद्दल त्याने सतीश कौशिकसोबत कथानक शेअर केले होतं. इतकचं नाही सतिश यांनी सलमानला वचन दिले होते की तो या चित्रपटेच्या पटकथेवर लवकरच काम सुरू करेल. त्यांची हीच अपूर्ण ईच्छा सलमानने पूर्ण करण्याचे ठरविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.