अर्जुन तेंडुलकरने उद्गारले कॅमेरा मॅन अपशब्द !

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) हा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचा मुलगा असल्याने त्याच्याकडे पाहाण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. सचिन तेंडुलकरच्या मुलाने आयपीएल २०२३ (IPL 2023) मध्ये आपला पहिला सामना खेळला. दोन सामन्यात त्याने चांगली गोलंदाजी केली. हैदराबाद (Hyderabad) विरुद्धच्या सामन्यात शेवटचं शतक व्यवस्थितरित्या टाकत क्रीडारसिकांची मनं जिंकली. 20 धावा आवश्यक असताना अवघ्या पाच धावा देत मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) विजय मिळवून दिला. इतकंच काय तर आयपीएलमधील पहिल्या विकेटची नोंदही केली. पण सध्या त्याचा एक व्हिडीओ वायरल होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडीओ मुंबई इंडियन्सच्या फलंदाजी वेळचा आहे. यात अर्जुन तेंडुलकर डगआऊटमध्ये बसलेला दिसत आहे. तेव्हा कॅमेरामन त्याला स्क्रिनवर दाखवतो. यानंतर अर्जुन रागात सहकाऱ्याकडे आपला भावना व्यक्त करताना दिसत आहे. या व्हिडीओतील लिप सिंकवरून सोशल मीडियावर वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत. अनेक नेटकऱ्यांचं म्हणणं आहे कि, अर्जुनाने कॅमेरा पर्सनला अपशब्द बोलतांना दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.