श्रद्धा वालकर प्रकरणात दिल्‍ली उच्‍च न्‍यायालयाचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

श्रद्धा वालकर (Shraddha Walker) प्रकरण सर्वांचाच लक्षात राहणार आहे. किती अमानुषपणे श्रद्धाची हत्या करून तिचे तुकडे केलंत. त्याच प्रकरणात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी आज दिल्‍ली उच्‍च न्‍यायालयानं (Delhi High Court) मोठा निर्णय दिला. या प्रकरणी दाखल आरोपपत्रातील मजकूर दाखवण्‍यास किंवा त्‍याची माहिती देण्‍यास सर्व वृत्तवाहिन्‍यांना न्‍यायालयानं मनाई केली आहे.

त्याचबरोबर या प्रकरणाच्या तपासादरम्यान गोळा केलेली इतर सामग्री प्रसारित करण्यापासून प्रसिध्दी माध्‍यमांना प्रतिबंधित करावी, अशी मागणी करणारी याचिका दिल्‍ली पोलिसांनी दाखल केली होती. न्‍यायमूर्ती रजनीश भटनागर (Rajnish Bhatnagar) यांच्‍या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत सर्व वृत्तवाहिनींनी श्रद्धा वालकर खून प्रकरणाचे आरोपपत्रातील मजकूर प्रदर्शित करु नये किंवा दाखवू नये, असे निर्देश न्‍यायमूर्ती रजनीश भटनागर यांनी केंद्र सरकारला दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.