सावधान; बोर्नव्हिटा पिताय? करू शकते आरोग्यावर घातक परिणाम

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

 

कॅडबरीच्या बोर्नव्हिटा हे सगळ्यांनीच लहानपणी खाल्ले व दुधातून घेतले आहे, इतकाच नाही तर अजूनही नागरींग आपल्या मुलांना देतात. याच संदर्भात एक व्हिडीओ वायरल झाला आणि नागरिकांनी बोर्नव्हिटा कंपनीला ट्रोल कारण सुरु केले. या बोर्नव्हिटाबाबतच्या एका न्युट्रिशिअनिस्टने (Nutritionist) केलेल्या व्हिडीओमुळे खळबळ उडाली होती. यावर आता खुलासे देखील आले आहेत. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेल्या एका तरुणाने एक मिनिटाचा व्हिडीओ पोस्ट केला होता. यामध्ये त्याने बोर्नव्हिटामध्ये अधिक मात्रेमध्ये साखर (Sugar) आणि घातक रसायने असल्याचे म्हटले होते.

हा व्हिडीओ पाहून अनेकांनी बोर्नव्हिटाला बॉयकॉट (Boycott) करण्याची मागणी केली होती. यावरून वाद सुरु होताच कंपनीने या तरुण न्युट्रिशिअनिस्टला कायदेशीर नोटीस पाठविली होती. यामुळे या तरुणाला त्याची पोस्ट हटवावी लागली आहे. इन्फ्लुएंसर रेवंत हिमतसिंगकाने हा व्हिड़ीओ पोस्ट केला होता. जो प्रमा मोठ्याणावर व्हायरल झाला आहे. त्याने एक व्हिडिओ शेअर करून बोर्नव्हिटाच्या गोडपणावर प्रश्न उपस्थित केले होते. बोर्नव्हिटामध्ये मोठ्या प्रमाणात साखर असल्याचे त्याने म्हटले होते. कोको सॉलिड्स आणि कॅन्सर निर्माण करणारे रंग असतात. जे मुलांसाठी घातक ठरू शकते, असेही त्याने म्हटले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.