विज केंद्राचे पाईप चोरी प्रकरणी तीघावर गुन्हा दाखल

0

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

वरणगाव-भुसावळ तालुक्यातील दिपनगर औष्णीक विज केंद्राचे (Dipnagar Thermal Power Centre) विल्हाळे बंडात राख वाहून नेणाऱ्या पाईप लाईनच्या चोरी प्रकरणात वरणगाव पोलीसांनी तिघावर गुन्हा दाखल करीत पाईप व ट्रॅक्टर ताब्यात घेतले या बाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की तालुक्यातील दिपनगर औष्णीक विज केंद्रतील कोळशाची राख पाईप लाईन द्वारे विल्हाळे बंडात सोडली जाते दि १९ च्या रात्री दोन वाजेच्या सुमारास पाईप लाईन सुरक्षा रक्षक रुपेश पाटील, रितेश महाजन, समाधान कोळी हे गस्त घालत असताना त्यांना बंडात तीन इसम गॅस कटरने पाईप लाईन तोडून ट्रॅक्टर मध्ये ठेवताना दिसताच त्यांनी त्यांच्या वरिष्ठ राजेश कोळी यांना कळविले व घटना स्थळी धाव घेऊन त्याच्या थोड्या अतंरा जवळ जाऊन पाहीले असता त्यातील एक पूर्वी पाईप लाईनवर सुरक्षा रक्षक ऋषिकेश ज्ञानदेव महाजन असल्याची खात्री पटताच सुरक्षा रक्षकांनी त्यांना हटकताच पाईप व ट्रॅक्टर घेऊन आधाराचा फायदा घेत पसार झाले होते याची खबर वरणगाव पोलीस स्टेशनला देताच वरणगाव पोलीसांनी ट्रॅक्टर व सुमारे आठ फुट लांबीचे आठशे कि ग्रा वजन वीस हजार रुपये किंमतीचे पाईप ताब्यात घेतले. याबाबत वरणगाव पोलीस स्टेशनला सुरक्षा रक्षक राजेश कोळी यांच्या फिर्यादीनुसार ऋषिकेश ज्ञानदेव महाजन, सुनिल जोहरे (पुर्ण नाव माहीत नाही) प्रसिक जोहरे यांच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.