सावधान; राज्यात पुन्हा सक्रिय होतोय कोरोना

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

देशात कोविडचे (Covid) रुग्ण वाढत चालले आहेत. त्यामुळं सक्रिय रुग्णांची संख्या 63,562 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत या जीवघेण्या विषाणूमुळं 38 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. संसर्गाच्या झपाट्यानं लोकांची चिंताही वाढली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या (Ministry of Health) बुधवारच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 10,542 नवीन रुग्ण आढळले आहेत, जे कालच्या तुलनेत 38 टक्क्यांनी अधिक आहेत.

भारतातील रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 98.67 टक्के आहे. आतापर्यंत देशात एकूण 4,42,50,649 लोक संसर्गमुक्त झाले आहेत, तर कोविड-19 मुळं मृत्यूचं प्रमाण 1.18 टक्के आहे. आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, भारतातील देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत अँटी-कोविड-19 लसींचे 220,66,27,758 डोस देण्यात आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.