ACB ची कारवाई; लाच घेतांना कोतवालासह एकास रंगेहात अटक…

0

 

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकार्‍यांची सापळा रचून 12 हजार रुपयांची लाच स्वीकारताना भुसावळ सजाचे कोतवाल व त्यांच्या पंटरास रंगेहात पकडले आहे. शेतजमीन खरेदीनंतर सातबारा उतार्‍यावर शेतकर्‍याचे नाव लावून देण्याचे काम करून देण्यासाठी मागितली होती 15 हजारांची लाच. या प्रकरणी दोन्ही इसमांविरुद्ध भुसावळ शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची कारवाई उशिरापर्यंत सुरु होती.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांनी सन 2022 मध्ये तालुक्यातील कुर्‍हे पानाचे येथे दोन एकर शेतजमीन विकत घेतली होती. या शेत जमिनीच्या सातबारा उतार्‍यावर तक्रादार यांचे स्वतःचे नाव लावण्यासाठी त्यांनी तलाठी कार्यालय कुर्‍हे पानाचे येथे प्रकरण टाकले होते. या प्रकरणात भुसावळ मंडळ अधिकारी योगिता पाटील यांनी त्रुटी काढून तक्रारदार यांना भुसावळ तहसील कार्यालयाचे कोतवाल कोतवाल रवींद्र लक्ष्मण धांडे (54), रा.भुसावळ यांना भेटण्यास सांगितले. तक्रारदार त्यांना भेटले असता सातबारा उतार्‍यावर मंडळ अधिकारी यांच्याकडून नाव लावून आणतो. मात्र त्याच्या मोबदल्यात मंडळ अधिकारी यांचे नाव सांगून 15 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली, तडजोडीअंती 12 हजार रुपये लाचेची मागणी केली. मात्र लाच देण्याची नसल्याने तक्रारदाराने या संदर्भात एसीबीकडे तक्रार केली.

त्यानुसार दि. 18 रोजी पंचासमक्ष सापळा रचून तक्रारदार हे रक्कम घेवून आले असता भुसावळ सजाचे कोतवाल रवींद्र लक्ष्मण धांडे यांच्या इशार्‍यानंतर खाजगी कर्मचारी हरीष देविदास ससाणे (44), रा.आंबेडकर नगर, भुसावळ यांना 12 हजाराची लाच स्वीकारतांना पंचांसमक्ष जळगाव एसीबीच्या पथकाने अटक केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव व सहकार्‍यांनी भुसावळ तहसील कार्यालयाच्या आवारात मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास करण्यात आली. या दोन्ही इसमांविरुद्ध भुसावळ शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची कारवाई उशिरापर्यंत सुरु होती.

Leave A Reply

Your email address will not be published.