ऊसतोडणी कामगाराच्या मुलाने अप्रतिम अक्षरांनी पाडली सर्वाना भुरळ !

0

अहमद नगर / लोकशाही न्यूज नेटवर्क

सार्थक बटुळे या जिल्हा परिषदेच्या इयत्ता चौथी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अप्रतिम सुंदर अशा लेखनाची सर्वत्र चर्चा होत असून त्याने अहमदनगर जिल्ह्यातून हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला असून त्याच्या हस्ताक्षराचे सर्वचजण कौतुक करीत आहे . अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील  भारजवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत तो शिकत आहे. त्याचे आई-वडिल ऊसतोडणीसाठी बाहेरगावी गेले असून आईवडिलांच्या कष्टांना खऱ्या अर्थाने न्याय देतोय अशी पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

मोत्यासारखं हे सुंदर हस्ताक्षर एखाद्या मोठ्या व्यक्तीचे नसून चौथीत शिकणाऱ्या सार्थक बटुळे या चिमुकल्याचा आहे. आपल्या पाथर्डी तालुक्यातील भारजवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या सार्थकने हस्ताक्षर स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त् सध्या ऊसतोडणीसाठी त्याचे आई बाबा बाहेरगावी गेले आहेत.सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सार्थकवर शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्याचे भवितव्य उज्ज्वल असून तो मोठे नाव कमावेल अशा कितीतरी शुभेच्छा त्याला मिळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.