रासेयो स्वंयंसेवकांचे विद्यापीठात पथसंचलन

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजनेच्या 33 स्वयंसेवकांनी विद्यापीठाच्या मुख्य इमारती समोर पथसंचलन करून राष्ट्रध्वजाला सलामी दिली.

याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक व्ही.एल.माहेश्वरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.नंतर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. मनोज आर इंगोले यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या विद्यार्थ्यांनी पथसंचलन केले .याप्रसंगी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रोफेसर एस.टी. इंगळे ,कुलसचिव डॉ. विनोद पाटील, विद्यापीठाचे वित्त आणि लेखा अधिकारी रवींद्र पाटील, राष्ट्रीय सेवा योजनाचे संचालक डॉ. सचिन नांद्रे, सामाजिक शास्त्र प्रशाळेचे संचालक डॉ. अजय पाटील, आणि विविध प्रशाळेचे संचालक, विभाग प्रमुख, प्राध्यापक ,विद्यार्थी तसेच विद्यापीठातील विविध प्राधिकरणे आणि प्रशासकीय विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.