बैलांना पाणी पाजण्यासाठी गेलेला रामेश्वर परतलाच नाही

0

पहूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

बैलांना पाणी पाजण्यासाठी धरणावर गेलेल्या १५ वर्षीय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना पहूर येथे गुरुवारी (ता. २) पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

पहूर येथील आर. टी. लेले हायस्कूलमध्ये इयत्ता ९ वीत शिकणारा (वय १५) हा विद्यार्थी वडिलांना मदत व्हावी म्हणून खळ्यातील बैल पाणी पाजण्यासाठी पावर हाउसच्या बाजूलाच असलेल्या देवळी धरणावर बैलगाडी घेऊन गेला. त्याने बैल धुण्यासाठी आणि पाणी पाजण्यासाठी शर्ट आणि पॅन्ट काढून बैलगाडीवर ठेवली व बैल घेऊन पाण्याजवळ गेला. मात्र तो परत आलाच नाही. दरम्यान एकच बैल घरी परत आल्याने सारेच आश्चर्यचकित झाले.

बैलांना पाणी पाजण्यासाठी गेलेला रामेश्वर घरी न आल्याने घरच्यांना चिंता वाटली. प्रत्यक्ष धरणावर जाऊन पाहिले असता बैलगाडीवर रामेश्वरचे कपडे निदर्शनास आले. त्यामुळे धरण परिसरात त्याचा शोध घेतला असता पाण्याच्या तळाशी त्याचा मृतदेह आढळून आला. दरम्यान त्याला तातडीने पहूर ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तडवी यांनी तपासणी अंति त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी राजू तुकाराम सोनवणे यांनी दिलेल्या खबरीवरून पहूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.