डमी महिला उभी करून प्रॉपर्टी विकण्याचा डाव एलसीबीने उधळला !

0

जळगावातील महिलेसह तिघांना अटक

मूळ मालकाच्या संमतीविनाच डमी ग्राहक उभा करून सुमारे दोन कोटी रुपयांच्या प्रॉपर्टीची विक्री करण्याचा डाव जळगाव गुन्हे शाखेने उधळला असून या कारवाईत महिलेसह तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी अशाच पद्धत्तीने काही मालमत्ताधारकांची फसवणूक केल्याचा संशय आहे. आरोपींविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील आयोध्या नगरातील बखळ प्लॉट हा अनिता राजेंद्र नेहते यांच्या नावे असून सध्या त्या कामानिमित्त बाहेरगावी राहतात. त्यांच्या ऐवजी बनावट महिला उभी करून त्यांच्या नावे असलेला दोन कोटी रुपये किंमतीचे तीन प्लॉट विक्री करण्याचा प्लॅन आरोपींनी तयार केला. याबाबत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

हवालदार विजयसिंह पाटील, रवींद्र पाटील, ईश्वर पाटील, दर्शन ढाकणे, मोतीलाल चौधरी आदींनी ऑटोनगरातील संदीप हॉटेलजवळून संशयीत आरोपी राजू जगदेव बोबडे (42, विटनेर, ता.जि.जळगाव) यास ताब्यात घेतले. चौकशीअंती असता त्याने प्रमोद वसंत पाटील (46, विरावली, ता.यावल) आणि गंगा नारायण जाधव (42, अयोध्या नगर, जळगाव) यांच्या संमतीने बखळ प्लॉट विक्री करीत असल्याची कबुली दिली.

चौकशीत बनावट व डमी मालक व मालकीन उभे करून त्याच मालमत्ता धारकाचे बनावट आधारकार्ड व पॅनकार्ड तयार करून कमी किंमतीत विक्री करीत असल्याची कबुली आारोपींनी दिली आहे. याच पध्दतीने आरोपींनी अयोध्या नगरातील अनिता राजेंद्र नेहते यांचे दोन कोटी रुपये किंमतीचे तीन प्लॉट विक्री करण्याच्या तयारीत असल्याची कबुली दिल्याने मोठा गैरप्रकार पोलिसांच्या सतर्कतेने टळला आहे. आरोपींना पुढील कारवाईसाठी शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार संजय भांडारकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील बडगुजर, रतन गीते, रवींद्र सोनार करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.