भीषण अपघात एक तरुण ठार ; दोन जण जखमी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
कार आणि आयशरमध्ये झालेल्या भीषण अपघात एक तरुण ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना धरणगाव तालुक्यातील चिंचपूराजवळ रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली .

२ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास चिंचपुराजवळ आयशर (एम.एच. १९ झेड. ९००२) आणि वॅग्णर कार (क्र एम.एच.०४,डी.बी. ५९४१) हे सामोरा समोर एकमेकाला धडकले. या अपघातात कारमधील नरेश पाटील (वय ३० हिरापूर ता. पारोळा) हा तरुण जागीच ठार झाला तर समाधान पाटील (रा.तांडा खडके ता. एरंडोल) हे जखमी झाला आहे. तसेच आयशर चालक देखील जखमी झाला असून त्याच्यावर धरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलिसांनी घटनास्थळी पोहचले.

Leave A Reply

Your email address will not be published.