वेटरनेच हॉटेलमधील ३० हजारांची रोकड केली लंपास

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून हॉटेलच्या वेटरनेच गल्ल्यातील 30 हजाराची रोकड लांबविल्याची घटना धरणगाव शहरात घडली असून या प्रकरणी वेटरविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

धरणगाव शहरातील हॉटेल चंदनमध्ये वेटरच्या कामासाठी असलेला विजयसिंग शेरसिंग ठाकूर (रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव) याने 28 ते 30 जानेवारीच्या दरम्यान हॉटेलच्या खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून हॉटेलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर हॉटेलच्या काऊंटरमध्ये ठेवलेले 30 हजार रुपये काढत पळ काढला. हॉटेल मालक किशोर चौधरी यांनी या वेटरचा धरणगाव शहरात शोध घेतला परंतू तो मिळून आला नाही तसेच त्याच्या मोबाईलवर संपर्क साधूनही तो होत नसल्याने संशय बळावला. गुरुवार, 2 फेब्रुवारी रोजी हॉटेल मालक किशोर चौधरी यांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर विजयसिंग शेरसिंग ठाकूर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार राजेंद्र कोळी करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.