जैन धर्मातील संथारा घेणाऱ्यांची माहिती पाठवण्याचे आवाहन

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

दैनिक लोकशाही माध्यम समूहाच्या वतीने तीर्थंकर महावीर जैन मुनी आणि जळगाव या शंभर वर्षाचा ऐतिहासिक ठेवा असलेले पुस्तक तयार करण्यात येत आहे. त्यामध्ये पुण्यात्मा संथारा अंतर्गत जळगाव शहरासह जिल्ह्यात गेल्या शंभर वर्षात संथारा घेतलेल्या पुण्यात्मांची माहिती संकलित करण्यात येत आहे. जैन धर्मातील सर्व पंथांमध्ये ज्यांनी ज्यांनी संथारा घेतला, त्यांची तसेच त्यांच्या परिवाराची फोटोसह माहिती मागविण्यात येत आहे.

जळगाव जिल्ह्यातून संथारा घेणाऱ्या पुण्यात्मांची माहिती संकलित करण्यात येत आहे. कधी, कुठे आणि किती दिवसांचा संथारा झाला या बाबत उपलब्ध असलेली सविस्तर माहिती लोकशाहीचे सल्लागार संपादक धों. ज. गुरव (मो. क्र. ९५२७००३८९१) यांच्या व्हॉट्स ॲपवर किंवा [email protected] या ईमेल वर १५ फेब्रुवारी पर्यंत पाठवावी. असे आवाहन दैनिक लोकशाही माध्यम समूहाच्या वतीने करण्यात येत आहे.

या माहितीत संथारा घेणाऱ्या पुण्यात्मा यांचे जन्म ठिकाण, जन्मतारीख, किती दिवसांचा संथारा घेतला, मृत्यू समय त्यांचे वय, त्यांच्या परिवाराचा फोन नंबर सह सविस्तर परिचयाचा समावेश असावा.

Leave A Reply

Your email address will not be published.