संजय राऊत पुन्हा बरळले, शेतकऱ्यांवर गोळ्या झाडण्याची सरकारची तयारी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

शेतमालास किमान आधारभूत किंमत मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. या मागणीसाठी पंजाबमधून हजारो शेतकरी दिल्लीकडे निघाले आहेत. त्यांना रोखण्यासाठी सशस्त्र सेने तैनात करण्यात आलेली आहे. परंतु ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. दुसरीकडे शेतकरी पुढे गेले तर त्यांच्यावर गोळ्या झाडण्याची सरकारची तयारी आहे. अशी आपलीकडे गुप्त माहिती आहे. अदाणीला देण्यासाठी लाखो हजारो कोटींचे व्यवहार होतात. परंतु शेतकऱ्यांसाठी सव्वादोन कोटी लाख लागणार आहेत. यामुळे साठी कुठलीही तरतूद करण्यास सरकार तयार नाही, असा घणाघात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.

मराठा आक्षणाबाबत फसवणूक
मराठा आणि पंजाब हे कृषिप्रधान राज्य आहे. कांडा निर्यात महाराष्ट्रात शेतकऱ्यांची दिशाभूल सुरु आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी त्यांनी पाठिंबा द्यावा, यासाठी आपण उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो आहे. उद्या सकाळी उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर निघणार आहे. मराठा आरक्षणाचा विषय म्हणजे सरकारकडून फसवा-फसवीचा खेळ आहे. भाजप हा पक्षचं फसवा-फसवीच्या पायावर उभा आहे. मराठा समाजाबाबत सरकारने फसवणुकीचा प्रकार केला. तो मराठा समाजाला मान्य नाही. राज्यात उद्या जर कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली तर, उद्या मंत्री रस्त्यावर नाचणार आहेत का ? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

जागा वाटपाचा तिढा सुटलेला
महाविकास आघाडीच्या बैठका सुरू आहेत. एकमेकांशी संपर्क सुरू आहे. जागा वाटपाचा तिढा सुटलेला आहे. राहुल गांधी यांची भारत जोडून यात्रा महाराष्ट्रात येण्याआधी महाविकास आघाडीचे जागावाटप घोषित केला जाईल. महाविकास आघाडीत या विषयावरुन कोणतेही मतभेद नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.