भरधाव वेगाने जाणारा टँकर पुलावरून कोसळला खाली

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

एरंडोल येथील बसस्थानकासमोरील पुलावरून भरधाव वेगाने जाणारा टँकर चालकाचा ताबा सुटल्याने विजेचा खांब तोडून जवळपास शंभर फुटावर खाली कोसळला. त्यात टँकर चालक व क्लिनर दोघेही जखमी झाले आहे. मंगळवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास हा भयावह प्रकार घडला. विशेष म्हणजे भराव पुलाच्या दोन्ही बाजूला समांतर रस्ते असल्यामुळे सुदैवाने प्राणहानी झाली नाही.

(एम एच 15 जेजे 7999) या क्रमांकाचा टँकर पारोळ्याकडून येउन जळगावला जात असतांना ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे एरंडोल येथील महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेल्या समांतर रस्त्यावरून ये-जा करणे धोकेदायक ठरल्याची चर्चा होत आहे. बस स्थानक परिसरात अरुंद समांतर रस्ते, बेशिस्त वाहतूक, काली-पिली ऑटो, रिक्षा या खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची पार्किंग तसेच हात गाड्या व इतर प्रकारचे अतिक्रमण यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.