भुसावळहुन आस्था एक्सप्रेस अयोध्येसाठी रवाना

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

रावेर लोकसभा क्षेत्रातील रामभक्तांच्या अयोध्येला रामलल्लाच्या दर्शनासाठी जाण्यासाठी भुसावळ रेल्वेस्थानकातून ‘आस्था एक्सप्रेस’ मंगळवारी (दि. २०) रवाना झाली. या वेळी रेल्वे गाडीस खासदार रक्षा खडसे यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी हिरवा झेंडा दाखविला.

श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारीला पार पडल्यानंतर आता अयोध्या येथे मंदिरात जाऊन ‘याचि देही याचि डोळा’ श्री रामलल्लाचे दर्शन घेता यावे, ही इच्छा मनामनात आहे.

लाखो हिंदुजनांची ही इच्छा पूर्ण व्हावी, यासाठी भाजपतर्फे देशभरात ‘आस्था’ ही विशेष रेल्वेगाडी घेण्यात आला असून, आज रावेर लोकसभा क्षेत्रातील राम भक्त खासदार रक्षा खडसे यांच्यामार्फत आज अयोध्या धाम यात्रेसाठी रवाना झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून व भाजपच्या माध्यमातून तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनात खासदार खडसे यांच्यामार्फत विशेष सवलतीत हजारो रामभक्त उत्तम सोयीसुविधांसह सुरक्षित प्रवासासह या विशेष गाडीने मंगळवारी भुसावळ रेल्वेस्थानकातून रवाना झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.