रेडिओ जगतातील प्रसिद्ध आवाज हरपला, रेडिओ प्रेझेन्टर ‘अमीन सयानी’ यांचे निधन

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर येत आहे. रेडिओच्या जगतातील आवाजाचे जादूगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिग्गज रेडिओ प्रेझेन्टर आणि टॉक शो होस्ट अमीन सयानी यांचे निधन झाले आहे. ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

अमीन सयानी यांचे मंगळवारी संध्याकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. अमीन सयानी यांचा मुलगा राजील सयानी यांनी त्यांच्या निधनाची बातमी माध्यमांना सांगितली. अमीन सयानी यांच्या निधनाचे वृत्त कळताच त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला. सध्या शोधलं मीडियावर पोस्ट करत सेलिब्रिटींसह त्यांचे चाहते दु:ख व्यक्त करत आहेत.

अमीन सयानी यांच्या मुलाने सांगितले की, अमीन सयानी यांना मंगळवारी सायंकाळी ६ वाजता दक्षिण मुंबईतील घरी हृदयविकाराचा झटका आला. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना तात्काळ रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयात नेण्यात आले. उपचारानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

रेडिओवर तब्बल ४२ वर्षे चाललेल्या ‘बिनाका गीतमाला’ या त्यांच्या हिंदी गाण्याच्या कार्यक्रमाने यशाचे सर्व विक्रम मोडीत काढले होते. मीन सयानी यांना ऐकण्यासाठी त्यांचे चाहते दर आठवड्याला वाट पाहायचे. ‘गीतमाला’मुळे अमीन सयानी हे भारतातील सर्वात पहिले होस्ट बनले होते. त्यांनी हा संपूर्ण शो सादर केला होता. अमीन सयांनी यांनी या शोच्या माध्यमातून रेडिओ जगतामध्ये आपले वेगळेच स्थान निर्माण केले होते. त्यांचा मोठा चाहतावर्ग होता.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.