संजय दत्तचा निवडणूक लढण्यास नकार?

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

लोकसभा निवडणूक 2024 जवळ आली आहे. अनेक कलाकार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यात कंगना राणावत आणि अरुण गोविल यासारख्या बड्या कलाकारांचा समावेश आहे. या यादीत संजय दत्तचेही नाव असल्याचे बोलले जात होते. तो काँग्रेसकडून निवडणूक लढवणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या.

संजय दत्तने या सर्व गोष्टी अफवा असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार तो राजकारणात येणार नाही. त्याची तशी इच्छा असेल, तर तो स्वत: जाहीर करेल. संजय दत्तने X वर पोस्ट करून ही माहिती दिली. त्यांनी लिहिले आहे की, मला राजकारणातील माझ्या सहभागाबद्दलच्या सर्व अफवांना पूर्णविराम द्यायचा आहे. मी कोणत्याही पक्षात प्रवेश करत नाही किंवा निवडणूक लढवत नाही. मला राजकीय क्षेत्रात उतरायचे असेल, तर मी त्याची घोषणा करणारा पहिला व्यक्ती असेन. त्यामुळे आत्तापर्यंत माझ्याबद्दल ज्या काही बातम्या येत आहेत त्यावर विश्वास ठेवू नका.

संजय दत्त 2009 मध्ये समाजवादी पक्षाचा भागही होता. मात्र आपण काही विशेष करू शकत नाही, असे वाटल्याने त्यांनी सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला. 2019 मध्ये ते राष्ट्रीय समाज पक्ष मध्ये सामील झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यावेळी संजय दत्तनेही एक निवेदन जारी केले होते. यामध्ये त्याने राजकारणात येत नसल्याचे सांगितले होते. संजय दत्तचे वडील सुनील दत्त हे काँग्रेसचे मोठे नेते होते. ते युवा कार्य आणि क्रीडा मंत्रीही होते. मात्र संजय दत्त निवडणूक लढवणार नाही आहे. तो फक्त चित्रपटातच काम करणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.