पिस्तुलाचा धाक दाखवून १२ लाखांची रोकड चोरणाऱ्या दोन संशयितांना अटक

0

भुसावळ;- पिस्तुलाचा धाक दाखवून १२ लाखांची रोकड लुटणार्या दोन संशयितांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी मंगळवारी ९ एप्रिल रोजी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

सागर बबन हुसळे (फेकरी, ता.भुसावळ) व अतुल दीपक खेडकर (लहुजी नगर, जामनेर) अशी अटकेतील संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून ५ लाखांचे  वाहन व लुटीतील १० लाखांची रोकड जप्त करण्यात आली .

जामनेर येथील तेल व्यापार्‍याकडे भीमराव लक्ष्मण तायडे (वय ४४, जामनेर) हे रोखपाल आहेत.नशिराबाद येथे  ३ एप्रिल रोजी तेल विक्रीतून आलेली ११ लाख ७ हजार ४२ रुपयांची रोकड कापडी पिशवीत टाकून ते मदतनीसासह जामनेरकडे दुचाकीने सुनसगाव, कुर्‍हे पानाचेमार्गे निघाले होते. बुधवारी ३ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता महादेव माळ ते मांडवा दिगर फाट्यांचे दरम्यान चिंचेच्या झाडाजवळ पाठीमागून आलेल्या काळ्या रंगाच्या दुचाकीवरून त्रिकूटाने पिस्तुलाचा धाक दाखवत रोकड असलेली पिशवी लांबवली होती. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

भुसावळ तालुका पोलिसांनी संशयित आरोपी सागर हुसळे आणि अतुल खेडकर यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांना सोमवार ८ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता फेकरी गावातून अटक केली. त्यांनी त्यांची केली असता गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्याकडून १५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.