शिवसेनेतील फूट, ठाकरेंचा हट्ट अन्‌ पक्षाचे दोन तुकडे !

राहुल शेवाळेंचे घणाघाती आरोप

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघातून दोनवेळा निवडून आलेले शिवसेनेचे राहुल शेवाळे आता तिसऱ्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ही पहिली निवडणूक आहे जिथे राहुल शेवाळे हे आपल्याच सहकारी अनिल देसाईंविरोधात मैदानात उतरले आहेत. पक्ष फुटीमुळे उद्धव ठाकरे गटाला सहानुभूती मिळू शकते असे मानले जात आहे. शेवाळे यांनी सांगितले की, त्यांनी उद्धव ठाकरेंना समजावण्याचा खूप प्रयत्न केला की त्यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून स्विकारावे आणि बाळासाबेह ठाकरेंप्रमाणे पक्ष सांभाळावा. पण, त्यांच्या जिद्दीमुळे हे होऊ शकले नाही.

मुंबईच्या संपूर्ण विकासासाठी डेव्हलपमेंट प्लान पूर्णपणे लागू होणे आवश्यक आहे. पण, केंद्र आणि राज्यांमध्ये काँग्रेसचं सरकार असल्याने बीएमसी कधी डेव्हलपमेंट प्लान योग्य पद्धतीने लागू करु शकली नाही. मुंबईत डिफेंस, रेल्वेसह केंद्र सरकारची खूप जमीन आहे. भूसंपादन हा महत्त्वाचा मुद्दा आहे. डेव्हलपमेंट प्लान लागू करण्यासाठी 14 लाख कोटी रुपयांची गरज आहे. मी पंतप्रधान कार्यलयाला यासंबंधी निवेदन दिले आहे. जेणेकरुन बीएमसी, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या मदतीने हा प्लान लागू केला जाऊ शकेल. यामुळे मुंबईकरांना खूप सुविधा मिळतील. आता जेव्हा केंद्रात आणि राज्यात एनडीए आणि महायुतीचे सरकार आहे, तर मुंबईच्या विकासावर जोर देण्यात आला आहे. त्यामुळेच अटल सेतू, कोस्टल रोड आणि मेट्रो प्रकल्पावर अंमलबजावणी होऊ शकली.

फूट रोखण्यासाठी प्रयत्न

शिवसेनेत फूट पडण्यापूर्वी आणि फूट पडल्यावरही आम्ही उद्धव ठाकरेंना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. शिवसेनेतील फुटीनंतर तब्बल महिनाभर मी उद्धव ठाकरेंना समजावत राहिलो की ते पक्ष फुटण्यापासून वाचवू शकतात. मी त्यांनी सांगितलं की बाळासाहेबांप्रमाणे तुम्ही शिवसेना सांभाळा आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून स्विकारा. पण त्यांच्या हट्टामुळे हे होऊ शकले नाही. जेव्हा उद्धव ठाकरेंनी राज्यात महाविकास आघाडीसोबत युती केली तेव्हा मी सांगितले होते की महाविकास आघाडीसोबत जाऊ नये.

Leave A Reply

Your email address will not be published.