फैजपूर, ता. यावल : सावदा ते फैजपूर रस्त्यावर ९ एप्रिल रोजी रात्री १२.३० वाजेदरम्यान एका हरणास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जखमी झाले होते. मध्यरात्री फैजपूर येथील शेख फारुक शेख अब्दुला यांनी जखमी हरणाबाबत सपोनी नीलेश वाघ व वन विभागाचे वनपाल सतीश वाघमारे यांना माहिती दिली.
तत्काळ त्यांनी घटनास्थळी जाऊन हरणाला फैजपूर येथील पशू वैद्यकिय रुग्णालयात दाखल केले. आज सकाळी चितळ जातीचे हरीण गतप्राण झाले. मयत हरणावर पशू वैद्यकिय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. तर वन विभागातर्फे फैजपूर वन विभाग परिसरात वनक्षेत्रपाल फटागे, वनपाल सतीश वाघमारे यांनी अंत्यसंस्कार केले.