माझ्याकडे आलाय पेनड्राइव्ह ,सोमवारी पुरावे देणार – संदीप देशपांडे

0

लोकशाही न्युज नेटवर्क

कोरोना काळात विरप्पन गँगने मुंबईकरांना कसे लुटले याचे पुरावे असलेले पेनड्राइव्ह माझ्याकडे आले असून सोमवारी मी पुरावे सादर करणार असल्याचा दावा मनसेचे संदीप देशपांडे यांनी केला आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटावर अप्रत्यक्ष निशाणा साधताना टीका केली आहे. त्यांनी ठाकरे गटाचं नाव न घेता गंभीर आरोप केले आहेत. तीन दिवसांपूर्वी मी माझ्या शाखेत नसताना एक व्यक्ती आला आणि माझ्या ऑफीसमध्ये काही कागदपत्रं तसंच पेनड्राईव्ह सोडून गेला आहे. कोरोना काळात विरप्पन गँगने मुंबईकरांना कसे लुटले याचे पुरावे त्यामध्ये असल्याचा दावा संदीप देशपांडे यांनी केला आहे. सोमवारी हे सर्व पुरावे मी सादर करणार असल्याचे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.

माझ्याकडे जो पेनड्राईव्ह आहे त्यामध्ये सर्व पुरावे आहेत, तसेच काही खाते नंबर देखील आहेत. विरप्पन गॅंगमध्ये कोण आहेत त्यांची नावं देखील सोमवारी समोर येतील असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.