महात्मा गांधींचे वडील मुस्लिम जमीनदार ; संभाजी भिडे यांचे खळबळजनक वक्तव्य

0

अमरावती;- महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितले जाते, पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्‍यांचे खरे वडील असल्याचा खळबळ जनक खुलासा संभाजी भिडे यांनी अमरावतीमध्ये केला आहे.

अमरावतीतील कार्यक्रमात केलेल्या वादग्रस्‍त वक्‍तव्‍यामुळे ते आणखी अडचणीत येऊ शकतात.यापूर्वीही ते अनेकवेळा चर्चेत आले आहेत. बडनेरा मार्गावरील जय भारत मंगलम येथे गुरुवारी रात्री संभाजी भिडे यांच्‍या सभेचे आयोजन करण्‍यात आले होते.

भिडे म्‍हणाले, मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते, त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले, त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत. मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केले असल्याचे सबळ पुरावे उपलब्ध असल्याचा दावाही यावेळी संभाजी भिडे यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.