सलमानच्या हातातील घड्याळाची किंमत एकूण थक्क व्हाल..

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

किसी का भाई किसी की जान या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत असलेला सलमान खान अलीकडच्या काळात घड्याळ घालताना दिसत आहे. अनेक प्रसंगी लोकांनी सलमानच्या मनगटात चमकणारे सोनेरी रंगाचे रोलेक्स कंपनीचे घड्याळ पाहिले. पण या घड्याळाची किंमत क्वचितच कुणाला माहीत असेल.
सलमान खानच्या हातातील रोलेक्स घड्याळाची किंमत $57,200 आहे.

म्हणजेच त्याची किंमत सुमारे 47 लाख रुपये आहे. हे घड्याळ उच्च दर्जाच्या साहित्यापासून बनवले आहे. ऑयस्टर पर्पेच्युअल डे-डेट 36 डायल घड्याळ. हे 18 कॅरेट पिवळ्या आणि पांढऱ्या सोन्याचे बनलेले आहे. त्यात हिरेही जडले आहेत. डिसेंबर 2022 मध्ये सलमानच्या वाढदिवसालाही हे घड्याळ घातल्याचे सांगितले जात आहे.

फिल्मफेअरच्या पत्रकार परिषदेतही सलमान ते घड्याळ घातलेला दिसला होता. याशिवाय पाच दिवसांपूर्वी त्याने असा एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये रोलेक्सचे ते प्रिमियम घड्याळ त्याच्या मनगटात स्पष्टपणे दिसत आहे.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.