बालसुधारगृहातील भिंतीला शिडी लावून चार मुले पळाली

0

पुणे लोकशाही न्यूज नेटवर्क

येरवड्यातील (yerwada jail) बालसुधारगृहातील भिंतीला शिडी लावून चार मुले पळाल्याची घटना घडली. सलग हा दुसरा प्रकार घडला असून, यापुर्वी देखील गंभीर गुन्ह्यांमधील 6 मुले पळाली होती. येथील सुरक्षेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात पंडीत जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्रातील कर्मचारी सुमंत जाधव (वय 31) यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार, 9 अल्पवयीन मुलांना धमकावणे, गोंधळ घालणे तसेच कायदेशीर रखवालीतून पसार झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येरवड्यात पं. जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्राचे बालनिरीक्षण गृह आहे. बालसुधारगृहात गंभीर गुन्ह्यात सामील असलेल्या मुलांना बालन्याय मंडळाच्या आदेशाने येथे ठेवले जाते. दरम्यान, बालसुधारगृहात मुलांच्या दोन गटात वाद झाले होते. नऊ अल्पवयीन मुलांनी दोन मुलांना मारहाण केली. तसेच, गोंधळ घातला. या गोंधळाचा फायदा घेऊन या 9 पैकी त्यातील चार मुलांनी आवारात पडलेली शिडी उचलली. भिंतीला शिडी लावून उड्या मारून पसार झाली. पोलिसांकडून पसार झालेल्या अल्पवयीन मुलांचा शोध घेतला जात आहे. पोलीस उपनिरीक्षक विशाल पाटील तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.