उधारीच्या पैशांवरुन एकाच्या डोक्यात टाकली लोखंडी सळई

0

जळगाव : उधारीच्या पैशावरून वाद होऊन अनिल भगीरथ सोनवणे (रा. नांद्रा बुद्रुक, ता. जळगाव) यांना तीन जणांनी
मारहाण करत एकाने डोक्यात लोखंडी सळई मारली.

ही घटना दि. १३ फेब्रुवारी रोजी नांद्रा गावात घडली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उधारीचे पैसे असल्याने त्यावरून अनिल सोनवणे व गावातील तीन जणांमध्ये वाद झाला. यात तिघांपैकी एका जणाने सोनवणे यांच्या डोक्यात व कपाळावर लोखंडी सळई मारुन गंभीर दुखापत केली.

Leave A Reply

Your email address will not be published.