डोक्यात फरशीने मारून केले जखमी ; चौघांविरुद्ध गुन्हा

0

पाचोरा : कापसाची गाडी मागे पुढे घेण्याच्या कारणावरून वाद घालत एकाच्या डोक्यात फरशीने वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना तालुक्यातील तारखेडा येथे घडली आहे. याप्रकरणी जखमी व्यक्तीच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा – नोंदवण्यात आला आहे.

तालुक्यातील तारखेडा येथे कापसाची गाडी मागे पुढे घेण्याच्या कारणावरून वाद झाला होता. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यातच अंतुर्ली खुर्द येथील शाहरुख हाणिफ पठाण यांच्या डोक्यात फरशीने वार करत गंभीर जखमी करण्यात आले.

तसेच शाहरुख पठाण यांचे वडिल हाणिफ पठाण व भाऊ जुबेर यांना ही शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी शाहरुख पठाण यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस ठाण्यात नाना अभिमन पाटील, राहुल नाना पाटील, नाना पाटील यांचा मापाडी व एक शेतकरी अशा चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक धनंजय सुंदरडे करत आहेत.
एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करुन यशचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांसह नातेवाईकांनी आक्रोश केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.