ट्रकवर चढलेल्या चालकाचा विजेचा जोरदार धक्का लागून मृत्यू

0

जळगाव : खताच्या गोण्या दुकानावर उतरवण्यासाठी ट्रकवर चढून दोर सोडत असलेल्या चालकाला विजेचा जोरदार शॉक लागून नरसिंग प्रल्हाद सूरनार (वय २९, रा. बनवास, जि. परभणी) यांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना बुधवार, दि. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास तालुक्यातील आव्हाने गावात घडली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

परभणी जिल्ह्यातील बनवास येथील नरसिंग प्रल्हाद सुरनार हे बुधवारी सकाळी ट्रक चालक खताच्या गोण्या घेवून जळगाव तालुक्यातील आव्हाणे गावात आला होता. दुकानावर खत उतरवण्यासाठी त्यांनी एका ठिकाणी ट्रक थांबवून ते ट्रकवर चढला. यावेळी त्याठिकाणाहून गेलेल्या विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने त्यांचा जोरदार धक्का बसला. त्यामुळे चालक हा ट्रकवरुन थेट रस्त्यावर कोसळला. यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली. ही घटना ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी खासगी वाहनाने चालकाला तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करीत मयत घोषीत केले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात आकाशवाणी मृत्यूचे नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.