प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन

0

शिर्डी ;– प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज श्री साईबाबा समाधी मंदिराचे दर्शन घेतले. त्यानंतर प्रधानमंत्री श्री मोदी यांच्या हस्ते पूजा व आरती करण्यात आली. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

यावेळी प्रधानमंत्री श्री मोदी यांनी साई मंदिराची पाहणी करून मंदिरात उपस्थित भाविकांना अभिवादन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.