येत्या २२ जानेवारीला अयोध्येत रामलल्लाची प्रतिष्ठापना

0

नवी दिल्ली : अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेसाठी निमंत्रण दिले. पंतप्रधानांनी या निमंत्रणाचा स्वीकार करत या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्याचे भाग्य मिळत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ‘आजचा दिवस अनेक भावनांनी भरलेला आहे. आताच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्रट्रस्टचे पदाधिकारी माझ्या निवासस्थानी मला भेटण्यासाठी आले होते.

त्यांनी मला राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्येला येण्याचे आमंत्रण दिले. या आमंत्रणाबद्दल मी स्वतःला भाग्यवंत समजतो. आपल्या आयुष्यात या ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार होण्याचे भाग्य मिळणे, हे माझे सौभाग्य आहे, अशा भावना मोदींनी एक्स सोशल मीडियावर व्यक्त केल्या. आपल्या पोस्टसोबत मोदींनी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांसोबतच एक फोटोदेखील शेअर केला. अयोध्येतील राम मंदिरात पुढील वर्षी २२ जानेवारी रोजी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. १४ जानेवारी रोजी मकर संक्रांतीपासून हा सोहळा सुरू होणार आहे. सुमारे १० दिवस हा सोहळा चालेल. २२ जानेवारी रोजी पंतप्रधानांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर २४ जानेवारीपासून राम मंदिर भाविकांसाठी खुले होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.