साहित्य संमेलनात निवडणूक आयोगाचा स्तुत्य सहभाग

0

दिनांक २, ३ आणि ४ फेब्रुवारी रोजी अमळनेर येथे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. अमळनेरच्या साने गुरुजी साहित्य नगरीमध्ये होणाऱ्या या मराठी साहित्य संमेलनाचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्र बाहेरील मराठी भाषेवर प्रेम करणारे मराठी भाषिक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत. लाखो मराठी रसिकांची या तीन दिवसीय संमेलनात हजेरी लागणार आहे. त्यासाठी ही साहित्याची मेजवानी राहणार आहे. साहित्यिक हा खराखुरा समाज सुधारक असतो. या तीन दिवसीय साहित्य संमेलनात विविध विषयांवर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. बाल साहित्याला प्रोत्साहन मिळावे म्हणून खास बाल साहित्यिक संमेलन घेतले जाणार आहे. कथाकथन, कवी संमेलन, गझल, लेखनासंदर्भात परिसंवाद होणार आहे. प्रचार आणि प्रसारामध्ये साहित्यिकांकडून मोलाची कामगिरी केली जाते. लोकशाही सुदृढ करण्यासाठी साहित्यिकांचा हातभार महत्त्वाचा आहे. त्यासाठी या संमेलनातील मराठी भाषिकांचा निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाही सुदृढ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगातर्फे मराठी साहित्य संमेलनाचा योग्य तो उपयोग करून घेतला जातोय. त्याबद्दल राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक कार्यालय विशेषतः निवडणूक मुख्याधिकारी श्रीकांत देशपांडे यांचे अभिनंदन. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे २ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता उद्घाटन सोहळा व अध्यक्षीय भाषण पार पडणार आहे. त्यानंतर सायंकाळी ४:३० वाजता कविवर्य कै. ना. धो. महानोर सभागृहात मराठी साहित्यात तृतीय पंथी समुदायाचे चित्रण आले आहे का? ते कशाप्रकारे केले आले आहे? ते करताना लोकशाही मूल्याचे प्रतिबिंब उमटले आहे का? यांच्या पर्यंत लोकशाही पोहोचली आहे का? ती पोहोचण्यासाठी काय करता येईल? अशा विविध प्रश्नांची चर्चा या परिसंमादात केली जाणार आहे. या परिसंवादात एलजीबीटीआयक्यू समुदायाचे अभ्यासक आणि बिंदू क्यू आर राइट्स फाउंडेशनचे अध्यक्ष बिंदू माधव खरे, तृतीयपंथी म्हणजे परलिंगी समुदायातील सामाजिक कार्यकर्त्या शमीभा पाटील, विजया वसाने, पुनीत गौडा, डॅनियल मॅक्डोन्सा, महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे आदी मान्यवर सहभागी होणार आहेत. हा परिसंवाद लोकशाहीच्या सुदृढतेसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. याचे थेट प्रक्षेपण निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून तसेच फेसबुक, ट्विटर, युट्युब, इंस्टाग्राम या समाज माध्यमांच्या संकेतस्थळावरूनही होणार आहे. सध्या राज्यात देशात लोकसभा त्यानंतर विधानसभा निवडणुकीचा माहोल आहे. त्यासाठी मतदारांना निवडणूकित मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निवडणूक आयोगाचा मराठी साहित्य संमेलनातील सहभाग महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मतदार जागृतीसाठी हे व्यासपीठ उपयुक्त ठरेल यात शंका नाही. यामध्ये राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचे कार्य कौतुकास्पद आहे.

अमळनेर तालुक्याच्या ठिकाणी जरी हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत असले, तरी संमेलन साने गुरुजींची कर्मभूमी आणि सखाराम महाराजांच्या वास्तव्याने अंमळनेर ही पवित्र भूमी होय. अमळनेर मध्ये होणारे साहित्य संमेलन हे अख्या खानदेशाचे साहित्य संमेलन होय. त्यासाठी अंमळनेर नगरी नवरी सारखी नटली आहे. शासकीय स्तरावरून सुविधा उपलब्ध केल्या जात आहे. त्यासाठी जिल्ह्याचे तरुण-तरफदार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे सर्व शासकीय खात्यात मार्फत योजना राबवून घेण्यात कसलीही कमी ठेवत नाहीत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने महाराष्ट्रात अमळनेरची पर्यायाने जळगाव जिल्ह्याची मान ताट राहील यासाठी सतत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद परिश्रम घेत आहेत. युद्ध पातळीवरून अडीअडचणी सोडवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील हे स्वागत अध्यक्ष असून त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या सहकार्याने अखिल भारतीय साहित्य संमेलन महाराष्ट्रात लक्षवेधी ठरणार आहे. या सर्वांच्या प्रयत्नाने उद्यापासून होणारे तीन दिवसीय साहित्य संमेलन यशस्वी होईल या शंका नाही. पुन्हा एकदा साहित्य संमेलन यशस्वी होवो या शुभेच्छा…!

Leave A Reply

Your email address will not be published.