‘रामायण’ पुन्हा होणार दूरदर्शनवर प्रदर्शित, वाचा सविस्तर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

टीव्ही क्षेत्रात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली मालिका म्हणून रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेचे नाव घेतले जाते. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केल्याचे दिसून आले आहे. आता या मालिकेच्या संदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे.

२२ जानेवारी रोजी अयोध्येमध्ये राम मंदिराचे उदघाटन आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडल्याचे दिसून आले. यावेळी रामायण मालिकेचे निर्माते आणि त्या मालिकेत काम केलेल्या कलाकारांना देखील यावेळी निमंत्रित करण्यात आले होते. त्यात उल्लेख करायचा झाल्यास अरुण गोविल, दीपिका चिखलिया, सुनील लहरी हे सहभागी झाले होते. रामायण मालिकेत रामाची भूमिका करणाऱ्या अरुण गोविल आणि सीतेच्या भूमिकेतील दीपिका चिखलिया यांची लोकप्रियता कायम आहे.

रामायण मालिकेची लोकप्रियता बघता आता हि मालिका पुन्हा दूरदर्शनवर प्रसारित केली जाणार आहे. १९८७ मध्ये पहिल्यांदा रामायण मालिका दूरदर्शनवर टेलिकास्ट झाली होती. त्यानंतर आता दूरदर्शनच्या वतीने पुन्हा एकदा ही मालिका टेलिकास्ट होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

केव्हापासून ही मालिका प्रदर्शित होणार याबाबत माहिती समोर आलेली नाही. त्याच्या प्रदर्शनाच्याबाबत घोषणा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोनाच्या काळात देखील या मालिकेचे प्रक्षेपण करण्यात आले होते. त्यावेळीही त्याला मिळालेला प्रतिसाद प्रचंड होता.

Leave A Reply

Your email address will not be published.