‘बजेट’ अगोदरच समोर आले सिलेंडरचे भाव, वाचा सविस्तर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

अंतरिम अर्थसंकल्प आता अवघ्या काही तासांवर येतुन ठेपला आहे. देशातील ४ महानगरासह इतर ठिकाणी तेल विपणन कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या भावात बदल केला आहे. देशसातील व्यावसायिक गॅसच्या किंमतीत बदल झाला आहे. तर घरगुती गॅसच्या आघाडीवर केंद्र सरकारने ग्राहकांचा रोष काही ओढवून घेतला नाही. सलग सहाव्यांदा घरगुती गॅसच्या किंमती स्थिर आहेत. त्यात काहीच बदल झालेला नाही. घरगुती गॅस सिलेंडरचा भाव 30 ऑगस्ट रोजी वाढला होता. त्यानंतर त्यात बदल झालेला नाही. आता बजेटपूर्वी देशातील चार महानगरांमध्ये काय आहेत गॅस सिलेंडरचा भाव जाणून घ्या…

कमर्शियल गॅस सिलेंडरच्या भावात वाढ

कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किंमतीत मामुली वाढ दिसून आली. देशाची राजधानी दिल्लीत व्यावसायिक गॅसच्या किंमतीत १४ रुपये तर कोलकत्त्तामध्ये भाव १८ रुपयांनी वाढले. तर मुंबईतही व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. १५ रुपयांनी किंमतीत वाढ झाली. चेन्नईत १२.५० रुपयांनी किंमत वाढल्या, या चार महानगरात क्रमशः १७६९.५० रुपये, १८८७ रुपये, १७२३.५० रुपये आणि १९३७ रुपये असे भाव झाले आहे.

घरगुती गॅसची किंमत किती?

घरगुती गॅस सिलेंडरच्या भावात कोणताही बदल दिसला नाही. सलग सहाव्यांदा घरगुती सिलेंडरच्या किंमतीत कोणताच बदल दिसून आला नाही. आकड्यांनुसार, देशाची राजधानी दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडरची किंमत ९०३ रुपये, कोलकत्तामध्ये ९२९ रुपये भाव आहे. तर मुंबईत घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमत ९१८.५० रुपये आहे. चेन्नईत हा भाव ९१८.५० रुपये आहे. ३० ऑगस्ट २०२३ रोजीनंतर किंमतीत वाढ झालेला नाही. तर २९ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत २०० रुपये कपात केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.