३३व्या मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेत “सफरचंद” ची बाजी…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालानालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सरगम व अमरदीप, मुंबई निर्मित “सफरचंद” या नाटकाला संस्थेच्या सफरचंद या नाटकासाठी रु. ७ लाख ५० हजाराचे प्रथम पारितोषिक जाहीर झाले आहे. तर स्क्रिप्टीज क्रिएशन व रंगाई, मुंबई या संस्थेच्या पुनश्च हनिमून या नाटकास रु. ४ लाख ५० हजाराचे द्वितीय पारितोषिक आणि वेद प्रॉडक्शन्स हाऊस एलएलपी, मुंबई या संस्थेच्या “हिच तर फॅमिलीची गंमत आहे” या नाटकास रु. ३ लाखाचे तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे.

सफरचंद नाटकाने सर्वच विभागात आपले वर्चस्व दाखवत आपल्या नावे अनेक पारितोषिके केली. यामध्ये राजेश जोशी यांना दिग्दर्शनासाठी द्वितीय, शंतनू मोघे यांना पुरुष अभिनय रौप्यपदक, संदेश बेंद्रे नेपथ्य प्रथम, भौतेष व्यास प्रकाशयोजना प्रथम, सचिन-जिगर संगीत दिग्दर्शन प्रथम, तारा देसाई वेशभूषा प्रथम, राजेश परब रंगभूषा प्रथम पारितोषिक मिळाले आहे.

 

या स्पर्धेचा सविस्तर निकाल खालील प्रमाणे.

दिग्दर्शन :- प्रथम पारितोषिक (रु.१,५०,०००/-) संतोष पवार (नाटक- हिच तर फॅमिलीची गंमत आहे), द्वितीय पारितोषिक (रु.१,००,०००/-) राजेश जोशी (नाटक- सफरचंद ), तृतीय पारितोषिक (रु.५०,०००/-) संदेश कुलकर्णी (नाटक पुनश्च हनिमून)

नाट्यलेखन : प्रथम पारितोषिक (रु.१,००,०००/-) संदेश कुलकर्णी (नाटक पुनश्च हनिमून ) द्वितीय पारितोषिक (रु.६०,०००/-) डॉ. श्वेता पेंडसे (नाटक- ३८ कृष्ण व्हिला), तृतीय पारितोषिक (रु.४०,०००/-) आदित्य मोडक (नाटक-मी स्वरा आणि ते दोघं)

प्रकाश योजना : प्रथम पारितोषिक (रु.४०,०००/-) भौतेष व्यास (नाटक-सफरचंद ), द्वितीय पारितोषिक (रु. ३०,०००/-) अशुतोष पराडकर ( नाटक -पुनश्च हनिमून), तृतीय पारितोषिक (रु. २०,०००/-) रवि रसिक (नाटक-चारचौघी )

नेपथ्य : प्रथम पारितोषिक (रु.४०,०००/-) संदेश बेंद्रे (नाटक- सफरचंद), द्वितीय पारितोषिक (रु. ३०,०००/-) मीरा वेळणकर (नाटक- पुनश्च हनिमुन ), तृतीय पारितोषिक (रु.२०,०००/-) नाटक- ३८ कृष्ण व्हिला

संगीत दिग्दर्शन : प्रथम पारितोषिक (रु.४०,०००/-) सचिन जिगर (नाटक-सफरचंद ), द्वितीय पारितोषिक (रु.३०,०००/-) पुरुषोत्तम बेर्डे (नाटक-संज्या छाया) तृतीय पारितोषिक (रु.२०,०००/-) अशोक पत्की (नाटक- हिच तर फॅमिलीची गंमत आहे)

 

वेशभूषा : प्रथम पारितोषिक (रु. ४०,०००/-) तारा देसाई (नाटक- सफरचंद ),द्वितीय पारितोषिक (रु. ३०,०००/-) प्रतिमा जोशी व भाग्यश्री जाधव (नाटक-संज्या छाया), तृतीय पारितोषिक (रु.२०,०००/-) शाल्मली टोळये (नाटक-मी स्वरा आणि ते दोघं )

 

रंगभूषा : प्रथम पारितोषिक (रु.४०,०००/-) राजेश परब (नाटक- सफरचंद ), द्वितीय पारितोषिक (रु.३०,०००/-) उल्लेश खंदारे (नाटक-संज्या छाया), तृतीय पारितोषिक (रु. २०,०००/-) शरद सावंत (नाटक-मी, स्वरा आणि ते दोघं )

 

उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक व रु.५०,०००/-

पुरुष कलाकार : आनंद इंगळे (नाटक-खरं खरं सांग), डॉ. गिरीष ओक (नाटक- ३८ कृष्ण व्हिला), संदेश कुलकर्णी (नाटक- पुनश्च हनिमुन ), शंतनू मोघे (नाटक- सफरचंद), पंढरीनाथ (पॅडी) कांबळे (नाटक-कुर्रर्रर्ररं). स्त्री कलाकार : डॉ. श्वेता पेंडसे (नाटक- ३८ कृष्ण व्हिला), मुक्ता बर्वे (नाटक-चारचौघी), अमृता सुभाष (नाटक- पुनश्च हनिमून), पूर्णिमा केंडे अहिरे (नाटक-सारखं काही तरी होतयं), निवेदिता सराफ (नाटक-मी, स्वरा आणि ते दोघं)

दि. १७ एप्रिल ते ११ मे २०२३ या कालावधीत रविंद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई या ठिकाणी अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण १० व्यावसायिक नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रेमानंद गज्वी, डॉ. अनिल बांदिवडेकर, नारायण जाधव, श्रीमती स्वरुप खोपकर व श्रीमती मीना नाईक यांनी काम पाहिले. सर्व पुरस्कार विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.