काँग्रेस नेते सचिन पायलट यांचा पत्नी सारापासून घटस्फोट; निवडणूक प्रतिज्ञापत्रात मोठा खुलासा…

0

 

जयपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस कार्यकारिणी सदस्य सचिन पायलट आणि त्यांची पत्नी सारा पायलट वेगळे झाले आहेत. सचिन पायलट आणि सारा पायलट यांच्यात घटस्फोट झाला आहे. पायलट यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातून ही बाब समोर आली आहे. टोंक विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केल्यानंतर सचिनने दिलेल्या प्रतिज्ञापत्रात पत्नीच्या नावासमोर ‘घटस्फोटित’ असे लिहिले आहे.

Sachin Pilot divorced from wife

लग्न कधी झाले?

सचिन आणि सारा यांचा प्रेमविवाह झाला होता. या दोघांचे जानेवारी 2004 मध्ये लग्न झाले होते. लग्नाच्या 19 वर्षानंतर दोघांचा घटस्फोट झाला. सारा ही जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांची मुलगी आहे. सचिन आणि सारा यांना २ मुलं आहेत. सचिनने आपल्या दोन मुलांची नावे आश्रित स्तंभात लिहिली आहेत. याआधी 2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सचिन आणि सारा वेगळे झाल्याच्या बातम्या आल्या होत्या पण त्यावेळी या बातम्यांना दुजोरा मिळाला नव्हता आणि या वृत्तांचे खंडन करण्यात आले होते.

सचिन पायलटचे प्रतिज्ञापत्र

राजस्थान विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सचिन पायलट यांनी 31 ऑक्टोबर रोजी टोंक विधानसभेतून उमेदवारी अर्ज दाखल केला. या काळात त्यांनी दिलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांच्या मालमत्तेचा तपशीलही दिला असून पत्नीच्या रकान्यात त्यांनी ‘घटस्फोटित’ असा उल्लेख केला आहे.

सचिनने लंडनच्या युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियामधून एमबीएचे शिक्षण घेतले तेव्हा तिथेच त्याची सारा अब्दुल्लाशी भेट झाली. सचिन आणि सारा एकमेकांच्या प्रेमात पडले आणि लग्न केले. लग्नात धर्माचा अडथळाही आला पण सचिन पायलटने 15 जानेवारी 2004 रोजी सारासोबत लग्न केले.

Leave A Reply

Your email address will not be published.