मोबाईल टॉवरवरील आरआरयु कार्ड चोरटयांनी लांबवीले ; गुन्हा दाखल

0

जळगाव-;- मोबाईल टॉवरला लावलेले आरआरयु कार्डचे ३ नग अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शहराजवळील गीताई नगरात समोर आली असून याबाबत शनिपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुना खेडीरोड येथील गीताई नगरात एअरटेल कंपनीचे टॉवर लावण्यात आलेले आहे. या टॉवरमध्ये आरआरयू कार्डचे वापर करण्यात आलेला असून ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी टॉवरला लावलेले आरआरयू कार्डचे तीन नग चोरून नेले. हा प्रकार बुधवारी ३ जानेवारी रात्री ८ ते गुरूवारी ४ जानेवारी सकाळी ९.३० वाजता दरम्यान घडला असून सुरक्षा अधिकारी रवींद्र पाटील यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रकाश गवळी हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.