सुभाष चौकातून १३ वर्षीय मुलीचे अपहरण ; गुन्हा दाखल

0

जळगाव ;- शहरातील गजबजलेल्या सुभाष चौक परिसरातून एका १३ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा धक्कदायक प्रकार ५ रोजी सकाळी ११ वाजता घडला असून याबाबत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात १३ वर्षीय अल्पवयीन मुलगीआपल्या परिवारासह रहायला असून जळगाव शहरातील सुभाष चौक परिसरातील भवानी मंदिर परिसरात शुक्रवारी ५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता पीडित मुलगी ही आली असता ती अचानक बेपत्ता झाली होती. तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेऊनही ती मिळून न आल्याने तिला फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद तिच्या पालकांनीशनिपेठ पोलीस स्टेशनला दिल्यावरून अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.