दुर्देवी ! प्रसिद्ध अभिनेत्याचे प्लेन क्रॅश, मुलींसह मृत्यू (व्हिडीओ)

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अमेरिकन अभिनेता क्रिश्चियन ऑलिव्हरचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. मुलगी मॅडिटा (१० वर्षे) आणि ॲनिक (१२ वर्षे) सोबतच पायलट रॉबर्ट सॅक्स अशी मृतांची नावे आहेत.

https://x.com/AlertasMundial/status/1742995475643416743?s=20

 

क्रिश्चियन ऑलिव्हरला क्रिश्चियन क्लेपसर म्हणूनही ओळखले जाते. अभिनेता ज्या विमानात प्रवास करत होता ते विमान बेकिया या कॅरेबियन बेटावर कोसळले. ख्रिस्तियन याच्या निधनामुळे संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या अपघाताचे वृत्त कळताच घटनास्थळी, मच्छीमार आणि तटरक्षक ताबडतोब घटनास्थळी पोहोचले. त्यांनी लगेचच चौघांचेही मृतदेह बाहेर काढले आहेत. अभिनेत्याचं विमान ग्रेनेडाइन्समधील बेकिया या छोट्या बेटावरून गुरुवारी दुपारी सेंट लुसियाला जात होते. ऑलिव्हर आपल्या दोन्हीही मुलींसोबत नवीन वर्षानिमित्त व्हेकेशनसाठी आला होता, अशी माहिती समोर आली आहे.

क्रिश्चियन ऑलिव्हर 51 वर्षांचा होता आणि तो त्याच्या अभिनयासाठी ओळखला जात होता. क्रिश्चियन ऑलिव्हरचे स्पीड रेसर आणि वाल्कीरी सारखे प्रसिद्ध चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडले होते. अलीकडेच क्रिश्चियन ऑलिव्हरने इंडियाना जोन्स या चित्रपटात प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.