निपाणे येथील घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करा; अन्यथा रिपाईचा तीव्र आंदोलनचा इशारा..

0

 

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

निपाणे तालुका पाचोरा येथील बौद्ध समाजाच्या वयोवृध्द महिलेचा सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यास मज्जाव करणाऱ्या, जातीयवादी गावगुंडांवर दाखल ऍट्रॉसिटी ॲक्ट सह इतर कलमा खाली गुन्ह्यातील आरोपींना तत्काळ अटक करून यथायोग्य कारवाई करावी. अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भडगाव तालुका शाखेतर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल. अश्या आशयाचे निवेदन कार्यकारी दंडाधिकारी मुकेश हिवाळे यांना देण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांच्या महाराष्ट्रामध्ये अश्या प्रकारच्या घटना घडणे ही दुदैवी बाब आहे. या घटनेचा सर्व समाज माध्यमातून जाहीर निषेध होत आहे. अश्या प्रवृतीच्या जातीयवाद्यांना पोलिसांनी तात्काळ अटक करावी. अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भडगाव तर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल व होणाऱ्या परिणामास संबधित प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा तालुका अध्यक्ष एस.डी. खेडकर यांनी दिला आहे.

निवेदन देतेवेळी तालुका अध्यक्ष खेडकर, निवृत्त पोलिस अधिकारी अशोक केदार, एरंडोल तालुका अध्यक्ष प्रवीण बाविस्कर, पाचोरा तालुकाध्यक्ष विनोद अहिरे, गुरुदास भालेराव, सुधाकर दोंदे, देवा बाविस्कर, सनी सोनवणे, चंद्रमणी बाविस्कर, ईश्वर बाविस्कर, सुधाकर सोनवणे, प्रीतम सोनवणे, शिवाजी पाटील, अजय सोनवणे, निलेश सोनवणे, भारत धोबी, राजू फाजगे, सुखदेव सुर्यवंशी, सुखदेव निकम, बाळासाहेब निकम, अजय निकम, संभाजी खैरे, परशुराम सुर्यवंशी, भैया बाविस्कर, संजय खैरनार, निर्मल सोनवणे, पुंडलिक सोनवणे, समाधान मोरे, मधुकर खैरनार, भगवान शिरसाठ, भीमा निकम, जगणं भराडी, रवी राखुंडे, पिरां राखुंडे, दगडु गायकवाड,प्रदीप खैरे, भैया महाजन, योगेश महाजन, आरिफ मलिक, तोशिफ शेख, सुनील सोनवणे, महेंद्र सरदार, संभाजी मोरे, सुनील राखुंडे, सुशील सोनवणे, तुषार शिरसाठ, संजय खैरनार, संदीप चव्हाण, सचिन बागुल, कांतीलाल मोरे, मनोज सोनवणे, विजय मोरे, आनंद साठे, अण्णासाहेब साठे, लोटन सुर्यवंशी, अविनाश अहिरे, सम्राट, देवा ब्राम्हणे, नाना खेडकर, आनंद भोई, विनोद खेडकर, अरुण जाधव, गौतम अहिरे, गौतम बाविस्कर यांच्या सह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.