टीम इंडियाला दुसरा झटका, रोहित शर्मा दुखापतग्रस्त !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

टीम इंडिया अफगाणिस्तान विरुद्ध वर्ल्ड कप 2023 मधील दुसरा सामना लवकरच खेळाला जाणार आहे. हा सामना अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे. टीम इंडियाचा स्टार ओपनर बॅट्समन शुबमन गिल हा आजारपणामुळे ऑस्ट्रेलियानंतर अफगाणिस्तान विरुद्ध खेळणार नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे टीम इंडिया आधीच अडचणीत सापडली आहे. त्यात आता अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियासाठी अजून एक वाईट बातमी समोर आली आहे. शुबमन गिल नंतर आता टीम इंडियाचा स्टार बॅट्समनला रोहित शर्माला दुखापत झाली आहे. त्यामुळे टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे.

रोहितला मंगळवारी अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी सरावादरम्यान दुखापत झाली. मात्र रोहितच्या दुखापतीबाबत अजूनही बीसीसीआयकडून अधिकृत माहिती समोर आली नाहीये. रोहितला सराव करताना पायाला बॉल लागला. रोहित मात्र यानंतरही सराव करत राहिला. आता रोहित जर या दुखापतीमुळे अफगाणिस्तान विरुद्ध खेळू शकला नाही, तर टीम इंडियासाठी तो मोठा झटका असेल.

दरम्यान शुबमन गिल पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्ताननंतर पाकिस्तान विरुद्धचा सामन्याला मुकणार आहे. शुबमनला डेंग्यु झाल्याने रविवारी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शुबमनच्या प्लेटलेट्स कमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र शुबमनला मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला. आता शुबमनला पूर्णपणे फीट होण्यासाठी किती वेळ लागतो याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.