दिल्लीत भयावह घटना समोर, कॅब चालकास तब्बल २०० मीटर फरपटत नेलं

0

दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

दिल्लीच्या वसंत कुंज नॉर्थ भागातून एका भयावह घटना समोर आली आहे. येथे एका कॅब चालकास तब्बल २०० मीटर अंतरापर्यंत फरपटत नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, ज्यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या घटनेबद्दल काल रात्री पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले तेव्हा त्यांना कॅब ड्रायव्हर रस्त्यावर गंभीर अवस्थेत आढळून आला.

समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी हे कॅब चालकाला लुटत होते, यावेळी टॅक्सीच्या मालकाने विरोध केल्यानंतर त्याच्यावर हल्ला करण्यात आला. यानंतर त्याला कारसोबत जवळपास २०० मीटर फरफटत नेण्यात आलं. याप्रकरणात दिल्ली पोलिसांनी ३०२ कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अद्याप आरोपी फरार आहे.

काही दिवसांपूर्वी देखील असाच प्रकार समोर आला होता. अंजली नावाच्या महिलेला फरफटत नेण्यात आलं होतं. ज्यामध्ये अंजलीच्या मृत्यू झाला होता. या घटनेला १० महिने झाले आहेत. इतक्यातचं दिल्लीतील अशाच दुसऱ्या एका घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.